लॉकडाऊन मध्ये जळीतकांड...

Foto
शहरात कडक लॉक डाऊन सुरू असतानाही काही उपद्रवी सक्रिय झाले आहेत. संजयनगर भागात घरासमोर उभी दुचाकी जाळल्याची घटना काल मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
 या घटनेमुळे पोलिसांच्या  रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की,   शेख युनूस शेख रसूल वय-२४ रा.संजयनगर बायजीपुरा) यांचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने त्यांचा धंदा बंद आहे.रात्री जेवण केल्यानंतवर शेख यांचा संपूर्ण परिवार झोपी गेला होता.मात्र मध्यरात्री ३ च्या सुमारास अचानक घरात धूरांचे लोट येत असल्याने शेख यांना जाग आली.त्यांनी घराबाहेर जाऊन पाहिले असता घरासमोर लावलेली त्यांची (एम.एच.२०.सिपी, ८२२८) ही दुचाकी जळत होती.त्यांनी पाणी मारून  दुचाकीला लागलेली आग विझवली. मात्र तो पर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती.लॉक डाऊन मध्ये सर्वत्र पोलिसांची गस्त असताना समाज कंटकांनी दुचाकी जाळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून परिसरात गस्त वाढविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस करीत आहेत.